Share

“भाजपच्या धडपशाहीला भीक घालणार नाही” ; देशभरातील ईडी कार्यालयांवर काँग्रेस आंदोलन करणार

Published On: 

🕒 1 min read

पुणे :  “केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केवळ राजकीय द्वेषातून आमच्या नेत्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची नोटीस पाठवली आहे. या प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नाही. नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला आर्थिक लाभ अथवा पैसे मिळालेले नाहीत. २०१५ सालीच बंद झालेले हे प्रकरण परत काढण्यामागे केवळ गांधी कुटुंबाला विनाकारण त्रास देण्याचा प्रकार आहे. परंतु, काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीत भाजपा सरकारच्या या दडपशाहीसमोर झुकणार नाही. भाजपच्या या दडपशाहीविरोधात काँग्रेस सोमवारी १३ जून रोजी मुंबई आणि नागपूर येथील ईडी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करणार आहे,” अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज पत्रकार परिषेदेत दिली.

पुणे येथील गांधी भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना अतुल लोंढे म्हणाले, “नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राची स्थापना १९३७ साली पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पुरुषोत्तम टंडन, आचार्य नरेंद्र देव, रफी अहमद किडवई या महान नेत्यांनी केली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नॅशनल हेराल्ड या वर्तमानपत्राने मोलाची भूमिका बजावत देशाची सेवा केली. इंग्रज सरकारने या वृत्तपत्रावर १९४२ ते १९४५ दरम्यान बंदी घातली होती. स्वातंत्र्यानंतरही लोकशाही, संविधान व काँग्रेसचा विचार पुढे चालू ठेवण्यासाठी हे वर्तमानपत्र तोट्यात असतानाही चालूच ठेवले होते. या वर्तमानपत्रातील पत्रकार, कर्मचारी यांचा पगार देता यावा यासाठी काँग्रेस पक्षाने नॅशनल हेराल्डला २००२ ते २०११ दरम्यान ९० कोटी रुपये १०० हप्त्यात कर्जाने दिले. अशा प्रकारे कर्ज देणे कोणत्याही कायद्याखाली बेकायदेशीर नाही. हा सर्व व्यवहार पूर्ण पारदर्शक आहे. यात कसल्याही प्रकारच्या चल-अचल संपत्तीचे हस्तांतरण झालेले नाही व कोणालाही लाभ झालेला नसताना मनी लाँडरिंगचा गुन्हा कसा होतो?”, असा सवाल अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

अतुल लोंढे या प्रकरणाबाबत म्हणाले, “९० कोटींचे कर्ज नॅशनल हेराल्डला परत करणे शक्य होत नसल्यानेच असोसिएटेड जनरल लिमिटेडने ते इक्विटी शेअरमध्ये परावर्तित केले आणि हे शेअर ‘यंग इंडिया’ या ‘नॉट फॉर प्रॉफिट’ कंपनीला कलम २५ अंतर्गत हस्तांतरित करण्यात आले. त्यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, ऑस्कर फर्नांडिस, मोतीलाल व्होरा, सुमन दुबे हे या कंपनीचे व्यवस्थापकीय सदस्य आहेत. यांना कोणत्याही प्रकारचा लाभांश मिळालेला नाही. हे सर्व सुर्यप्रकाशासारखे स्वच्छ असताना केवळ राजकीय द्वेषातून ही कारवाई केली जात आहे.”

“नेहरू-गांधी कुटुंबाने स्वतःची संपत्ती देशाला दान दिली, कुटुंबियांनी देशासाठी त्याग केले, बलिदान दिले. पण त्या कुटुंबाला नाहक त्रास देण्याच्या भाजपाचा एक भाग आहे. परंतु भाजपाच्या या हुकूमशाहीसमोर काँग्रेस पक्ष कधीही झुकणार नाही. सोमवारी १३ जून रोजी देशभर ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करून या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात येईल. मुंबईतही सोमवारी दुपारी १२ वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ईडी कार्यालय मोर्चा काढला जाणार आहे,” असेही लोंढे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!