Share

“ये तो एक झाकी है, पुणे महानगरपालिका बाकी है”, चंद्रकांत पाटलांचे ट्वीट चर्चेत

Published On: 

मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे  संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत मविआ सरकारला इशारा दिला आहे.

“ये तो एक झाकी है, पुणे महानगरपालिका बाकी है”, असे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच कोल्हापुरच्या पहिलवानाने ‘हाप की डाव’ टाकला आणि राऊत सहाव्या क्रमाकांवर फेकले गेले. आता असाच हाप की डाव पुणे महानगरपालिकेत टाकायचा आहे. असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

https://twitter.com/ChDadaPatil/status/1535901669367484417

दरम्यान दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यसभा निवडणूक होण्यापूर्वी काहीजण बढाया मारत होते. पण त्यांना स्वत:चे आमदारही वाचवता आले नाही. इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली नाही त्या भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. फडणवीसांवर टीका करत होते. उद्धव ठाकरेंवर नामुष्की आली असून असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणे हे राज्याचे दुर्दैव आहे. अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. तसेच सत्तेसाठी १४५ जणांचा पाठिंबा लागतो. मात्र तुम्ही अल्पमतात असल्यामुळे तुम्ही राजीनामा द्या. तुम्हाला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!