बीड : भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावलल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र असंतोषाची लाट आहे. राज्यसभा पाठोपाठ विधानपरीषेद पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नव्हती. यामुळे त्यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता मुंडे यांचे समर्थक अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा बीड जिल्ह्यातील पारगाव येथे दाखल झाला होता. या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न मुंडे समर्थकांनी केला आहे. यावेळी त्यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली.
गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आपल्याला विधानपरिषदेची संधी दिल्यास आपण त्याचे सोने करु, असे म्हंटले होते. त्यामुळे त्यांना विधान परिषदेसाठी संधी मिळेल, अशी चर्चा राजकीय परिघात सुरु झाली होती. पण पंकजा यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सध्या बीड दौऱ्यावर आहेत. पारगाव येथे त्यांचा ताफा अडवत पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणा दिल्या.
काही दिवसांपूर्वी या नाराजीतून भाजपच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता, तर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीत तीव्र नाराजीतून एका मुंडे समर्थकाने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता.
महत्त्वाच्या बातम्या :


