Share

विश्वास नांगरे पाटलांना निलंबित करावे; प्रकाश आंबेडकरांची मागणी

Published On: 

अकोला: एसटी कर्मचाऱ्यांनी ८ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सिल्वर ओक या घराबाहेर आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या प्रकरणावरच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

“शरद पवार यांच्या घराबाहेर अनुचित घटना घडू शकते याचे पत्र घटनेच्या चार दिवसा अगोदरच सह पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते. या पत्रात सिल्व्हर ओकच नव्हे तर मुख्यमंत्री यांचे निवासस्थान मातोश्री बंगला आणि वर्षा हे शासकीय निवासस्थान, परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान व वांद्रे येथील निवास स्थान या ठिकाणी एस.टी. कर्मचारी करू शकतात असे नमूद केले होते. या सर्व बाबींची माहिती असताना सुद्धा पोलीस विभागाच्या चुकीने एवढी मोठी घटना घडली. या घटनेस जबाबदार असणारे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची चौकशी करण्याऐवजी त्यांनाच सदर चौकशी समितीच्या प्रमुख पदी नियुक्त करणे ही बाब आक्षेपार्ह आहे. त्यामुळे या घटनेस जबाबदार असलेले सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना निलंबित करण्यात यावे.”, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

दरम्यान यावरच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही आज प्रतिक्रिया देत शंका उपस्थित केली आहे. “शरद साहेब आमचे राजकीय विरोधक असू शकतात परंतु ते महाराष्ट्राचे व देशाचे महत्वाचे नेते आहेत. त्यांच्या घरावरच्या हल्ल्यावर सखोल चौकशी करण्याची गरज आहे याची सातत्याने मागणी आम्ही करतोय. मीडिया त्याठिकाणी उपास्थित होता आणि पोलिसांना माहीतच नव्हते असं कधीच होत नाही. त्यामुळे हा मविआ सरकारचाच किंवा कोणत्या नेत्याचा डाव होता का? याची चौकशी व्हायला हवी.”, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, सभेत उंचावली होती तलवार

“तुम्ही फार धुरफुटे झालात, तुमचं तोंड बघा कसं सुजलंय”; आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

“सभेला गर्दी होते, पण मते मिळत नाही” आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं

“…मविआ सरकारचाच किंवा कोणत्या नेत्याचा डाव होता का?”, सिल्व्हर ओक प्रकरणी प्रवीण दरेकरांचा सवाल

राज ठाकरे आज भाजपच्या द्वेषमूलक विचारांची तळी उचलत आहेत- रोहित पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!