Share

“तुम्ही फार धुरफुटे झालात, तुमचं तोंड बघा कसं सुजलंय”; आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

Published On: 

मुंबई : राज ठाकरे यांची काल मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली. यावेळी राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. जितेंद्र आव्हाडांचा चेहरा नागानं फणा काढावा असा असल्याचा टोला थेट लगावला. दरम्यान त्यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले, तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर जाता इतरांच्या नाकावर जाता इतरांच्या रंगावर जाता म्हणजे तुमच्यामध्ये तो वर्णद्वेष किती ठासून भरलेला आहे हे लक्षात येत आहे. व्यंग रंग हे कधीही काढायचे नसतात मनुष्य जीवनामध्ये. आम्ही जर म्हंटल तुम्ही खूप धुरफुटे झाला आहात, तुमचं तोंड बघा कसा सुजलंय आवडेल तुम्हाला? राजकारणात व्यक्तिगत टीका करणे पाप आहे. इथे मतभेद होऊ शकतात मनभेद नाही. तुम्ही माझी अक्कल काढली आपण खूप हुशार आहात आपल्या आजोबांनी प्रतापसिंह राजे यांच्यावर लिहिलेले पुस्तक वाचून बघा. सातारच्या गादरीच्या वंशजांना कस कोंडून ठेवलं होत पेशव्यांनी आणि त्यांची आई साडेचार वाजता उठून सकाळी सगळे उठण्याच्या आधी ती शिकवायची प्रताप सिंह राजे भोसलेंना आठवत तुम्हाला?

तुम्ही म्हणायचे की शरद पवार कायम शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतात. शिवाजी महाराजांचं नाही. घेणार ना, शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली? महात्मा फुलेंनी. कुठलही हत्यार नव्हत पण केवळ ज्ञानावरती आधारित इतिहासाचं संशोधन करणे हे आश्चर्याच आहे. महात्मा फुलेंनी ही समाधी शोधली पाहिल्यांदा शिवजयंती साजरी केली शाहू महाराज तर त्यांचे वारसदार आहेत आणि हे दोघेही माझे आदर्श आहेत म्हणत बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यामुळे तिघांच्याही रक्तात, ओठात, क्रियेत शिवाजी महाराज आहेत. या तिघांचीही लेखन वाचून बघा. त्यामुळे या तिघांचे नाव घेण म्हणजे शिवरायांच्या विचारांचं नाव घेण. हे तुम्हाला नाही समजणार कारण तुम्हाला फुट पाडण्याची सवय आहे. राज साहेब तुम्ही शिव्या घालू शकता शिव्या आम्हीही घालू शकतो. फक्त आईबाबांनी आणि पवार साहेबांनी दिलेल्या संस्कृतीत बसत नाही. असे आव्हाडांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.

महत्वाची बातमी –

उत्तराखंडमध्ये काँग्रेसचं बदललं चित्र; पक्षाचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर
“माझ्या शिवराळ भाषेचं काल कौतुक व्हायला हवं होतं कारण…”, राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर
“राज ठाकरे भाजपचाच भोंगा”, संजय राऊत यांचा पलटवार
“…तर किरीट सोमय्यांना ‘शिवतीर्थ’वर बोलवून सत्कार करा”, संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
“त्यांना फार महत्व देऊ नका, योग्य वेळी मी…”, राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!