Share

“…मविआ सरकारचाच किंवा कोणत्या नेत्याचा डाव होता का?”, सिल्व्हर ओक प्रकरणी प्रवीण दरेकरांचा सवाल

Published On: 

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांनी ८ एप्रिलरोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सिल्वर ओक या घराबाहेर आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी १०४ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांनाही ताब्यात घेतले आहे. यावरच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ट्वीट करत शंका उपस्थित केली आहे.

“शरद साहेब आमचे राजकीय विरोधक असू शकतात परंतु ते महाराष्ट्राचे व देशाचे महत्वाचे नेते आहेत. त्यांच्या घरावरच्या हल्ल्यावर सखोल चौकशी करण्याची गरज आहे याची सातत्याने मागणी आम्ही करतोय. मीडिया त्याठिकाणी उपास्थित होता आणि पोलिसांना माहीतच नव्हते असं कधीच होत नाही. त्यामुळे हा मविआ सरकारचाच किंवा कोणत्या नेत्याचा डाव होता का? याची चौकशी व्हायला हवी.”, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

दरम्यान शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तर शरद पवार यांनी नेतृत्व चुकीचे असले तर त्याची किंमत कामगारांना चुकवावी लागते. एसटी कामगारांबाबत काय घडलं, हे लोकांनी टीव्हीवर पाहिलं. त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, सर्वसामान्य एसटी कामगारांना भडकावून चुकीच्या मार्गाला नेले असल्याचे दिसून येते. असे म्हटले होते. याबाबत सध्या तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या:

राज ठाकरे आज भाजपच्या द्वेषमूलक विचारांची तळी उचलत आहेत- रोहित पवार

व्यासपीठावरील ‘त्या’ कृतीमुळे राज ठाकरे अडचणीत ; गुन्हा दाखल होण्याची शक्यता

“माझ्यावरील दाखल गुन्ह्यांचा तपास सीबीआयला वर्ग करा” ; गिरीश महाजन

“मी त्याला शिवी म्हणतच नाही तो शिवसेनेच्या तोंडून…”, संजय राऊतांचा पलटवार

उत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; १० आमदार भाजपाच्या वाटेवर?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!