ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यात उत्तर सभा घेतली. या सभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेची चिरफाड केली. आपल्या खास शैलीत त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दरम्यान या सभेमुळे राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. व्यासपीठावर केलेली कृती त्यांना चांगलीच महागात पडणार आहे.
भाषणाला सुरवात करण्यापूर्वी राज ठाकरे यांना ठाण्यातील मनसैनिकांकडून तलवार भेट देण्यात आली. त्यानंतर राज ठाकरे यांनी ही तलवार म्यानातून बाहेर काढून उंचावली होती. या कारणावरून आता राज ठाकरे यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांच्यासोबतच सभेच्या आयोजाकांवर ही गुन्हा दाखल झाला आहे.
यावर अजूनही मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. यावर मनसे काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचं आहे. यामुळे आता मनसे आणि राज्य सरकार यांच्यात आणखी संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. .
महत्त्वाच्या बातम्या :
“सभेला गर्दी होते, पण मते मिळत नाही” आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं
“…मविआ सरकारचाच किंवा कोणत्या नेत्याचा डाव होता का?”, सिल्व्हर ओक प्रकरणी प्रवीण दरेकरांचा सवाल
राज ठाकरे आज भाजपच्या द्वेषमूलक विचारांची तळी उचलत आहेत- रोहित पवार
व्यासपीठावरील ‘त्या’ कृतीमुळे राज ठाकरे अडचणीत ; गुन्हा दाखल होण्याची शक्यता
“माझ्यावरील दाखल गुन्ह्यांचा तपास सीबीआयला वर्ग करा” ; गिरीश महाजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

