मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (१२ एप्रिल) उत्तर सभा घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, शिवसेना नेते संजय राऊत तसेच मशिदीवरील भोंगे याबाबत पुन्हा एकदा भाष्य केले. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
“मराठी अस्मिता, मुंबईचा स्वाभिमान, युवकांचा रोजगार हे मराठी मनातील मुद्दे आहेत. याच मुद्द्यांना घेऊन कधीही फायदा तोट्याचा विचार न करता मराठी मनाची भूमिका प्रखरपणे मांडणारे राज ठाकरे साहेब आज भाजपच्या द्वेषमूलक विचारांची तळी उचलत आहेत याचं नक्कीच दुःख आहे. असो!”, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.
काही कारणास्तव भूमिका या तात्पुरत्या बदलाव्या लागल्या असतीलही, पण मराठी मनातील अस्मितेची, स्नेहाची भावना मात्र कधीही बदलणार नाही, ही अपेक्षा आहे. महाराष्ट्राला दिल्लीपुढं झुकवण्याचे असंख्य प्रयत्न झाले व होत आहेत, परंतु स्वाभिमानी बाण्याचा महाराष्ट्र ना कधी झुकला.. ना कधी झुकणार. ‘तोडा-फोडा आणि राज्य करा’ या भाजपच्या ब्रिटिशकालीन रणनीतीला मराठी माणूस ओळखून असल्याने द्वेषमूलक विचारांच्या रणनीतीला महाराष्ट्राचं मराठी मन नक्कीच हद्दपार करेल, हा विश्वास आहे. असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, “महाराष्ट्रात जातीचं राजकारण पवारांनी सुरु केलं. ते फक्त शाहू फुले आंबेडकर याचं नाव घेतात पण, शिवाजी महराजांचं नाव घेत नाहीत. कारण शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर मुसलमान मते मिळणार कशी? शरद पवार हे नास्तिक असून त्यांना देवधर्माशी काही देणं घेणं.”
तसेच शरद पवारच मोदींना भेटून रेड टाकायला सांगत असतील. मला सांगा अजित पवारांच्या घरी छापा पडतो. मात्र सुप्रिया सुळेंच्या नाही पडत. शरद पवारांना कधीही चिडलेलं पाहिलं नाही. अजित पवारांच्या घरी रेड पडली, नवाब मलिकांना अटक झाली तरीही शरद पवार आणि मोदींचे संबंध मधुर कसे? सुप्रिया सुळे यांनी काही बोलू नये सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे. असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या:
“मी त्याला शिवी म्हणतच नाही तो शिवसेनेच्या तोंडून…”, संजय राऊतांचा पलटवार
उत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; १० आमदार भाजपाच्या वाटेवर?
“राज ठाकरे भाजपचाच भोंगा”, संजय राऊत यांचा पलटवार
“…तर किरीट सोमय्यांना ‘शिवतीर्थ’वर बोलवून सत्कार करा”, संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

