सातारा : काल ठाण्यात राज ठाकरे यांची उत्तरसभा झाली. राज ठाकरे यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मागील काही दिवसांपासून मनसेने प्रखरपणे हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. आगामी काळात भाजप माणसे युती होण्याची चिन्हे दिसत आहेत. मनसेने भाजपला अनुकूल असंही भूमिका घेत आहे. अनेक भाजप नेते राज ठाकरे यांचं कौतुकही करत आहेत.
आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. सातारा येथे ते पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. “भाजपचा मनसेला सोबत घेण्याचा निर्णय योग्य होणार नाही. आम्ही भाजपसोबत असल्याने त्यांनी मनसेला सोबत घेऊ नये. आरपीआय बरोबर असताना भाजपला मनसेची काय गरज,” असे आठवले म्हणाले.
पुढे आठवले म्हणाले, “मनसेच्या सभांना गर्दी होते पण मते मात्रं मिळत नाहीत. मनसे हा आता मागे पडलेला पक्ष आहे. मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला तरी त्यात काही एक फायदा होणार नाही. मनसेची फक्त एक जागा निवडून आली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या :


