पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरले आहे. ‘आमच्याकडून मिरवणुका निघतात, त्यावर दगडफेक होत असेल आम्ही गप्प बसणार नाही. आमचे हात बांधलेले नाहीत. आम्हालाही दगड हातात घेता येतो. समोर जे काही हत्यार असेल ते हत्यार आमच्या हातात देऊ नका,’ असा इशारच आज राज ठाकरे यांनी दिला.
आज पुण्यात राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी या दोन महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. ५ जून ला आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्याला जाणार अशी मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली. तसेच १ मे ला महाराष्ट्र दिनी आपण औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. याचा पुनरुच्चार ही राज ठाकरे यांनी केला.
देशाती सर्व हिंदूंना विनंती आहे की, ३ तारखेला तयारीत राहा. आता रमजान आहे त्यामुळे काही करायचं नाही . ३ तारखेपर्यंत समजलं नाही आणि या देशातील कायदा सुव्यवस्थेपेक्षा काहींना धर्म मोठा वाटत असेल, लाउडस्पीकर मोठा वाटत असेल तर जशास तसं उत्तर देणं आवश्यक आहे. आमची तयारी सुरु आहे या महाराष्ट्रात दंगली नकोय. हाणामारी नकोय. या महाराष्ट्रातील शांतता भंग कराची इच्छा नाही. पण माणुसकीच्या नात्याने मुस्लीम धर्मियांनी या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला विरोध नाही पण त्यांना लाउडस्पीकरूनच ऐकवायचं असेल तर आमच्याही आरत्या त्यांना लाउडस्पीकरून ऐकावे लागतील, असे राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्य बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

