सातारा : एक ‘गाव’ दोन भाग जंगलवाडीच्या लोकांची अवस्था झाली आहे. हे गाव एकाच ठिकाणी वसलेलं. सुमारे 400 लोकवस्तीचं गाव कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात विभागले आहे. त्यामुळे ‘अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे’ अशी येथील लोकांची अवस्था झाली आहे.
ज्यावेळी हे गाव वसले, तेव्हापासून या गावामागे विभागणी सुरु झाली होती. गावात साधारणपणे शंभरच्या आसपास घरे आहेत पण यातील काही घरे कऱ्हाड तालुक्याच्या तर काही पाटण तालुक्याच्या हद्दीत आहेत. तसेच गावाचा काही भाग कऱ्हाड तालुक्यातील कोरीवळे गावच्या हद्दीत तर काही भाग पाटण तालुक्यातील जाधववाडी गावच्या हद्दीत येतो. महसुलीदृष्ट्या हे गाव एकाच तालुक्यात घ्यावे, अशी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी केली आहे.
मात्र त्यांच्या मागणीला अद्याप यश आलेले नाही. शिक्षणासह इतर बाबींमध्ये दोन तालुक्यांचा प्रश्न आड येत नाही. पण कोणतंही महसुली काम करायला गेल्यास तालुक्याचा प्रश्न उद्भवतो. गाव एकच,पण तालुके दोन असल्यामुळे त्याच्या महसुली नोंदी वेगवेगळ्या ठिकाणी विभागल्या गेल्या आहेत. परिणामी, ग्रामस्थांना त्यांच्या शासकीय कामासाठी हेलपाटे घालावे लागत आहेत.
अधिवेशनातही गावाचा प्रश्न –
सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जंगलवाडी गावाचा प्रश्न २०१८ साली हिवाळी अधिवेशनामध्ये मांडला होता. या गावाला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी गाव एकाच तालुक्यात असावे, अशी मागणी करण्यात आली होती. तालुक्याप्रमाणेच जंगलवाडी गावाला दोन मतदारसंघ आहेत. कऱ्हाड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गावाची विभागणी झाली आहे. काही घरे कऱ्हाड उत्तर तर काही पाटण मतदारसंघात येतात. पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. काही मुलांच्या दाखल्यावर ‘तालुका पाटण’ तर काही मुलांच्या दाखल्यावर ‘तालुका कऱ्हाड’ असा उल्लेख असतो. पुढील शिक्षणासाठी या मुलांना चाफळ अथवा उंब्रजला जावे लागते. त्यासाठी मुले दररोज पायपीट करतात. गावातील एकूण लोकसंख्या : ४९५ यामध्ये कऱ्हाड तालुक्यात : १५४ तर पाटण तालुक्यात : ३४१ अशी लोकसंख्या आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

