मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.तर दुसरीकडे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. असे असतांनाच आज नवाब मलिक यांची ईडीच्या कारवाई विरोधात करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘मुंबई हायकोर्टाने नवाब मलिकचा बेल अर्ज फेटाळला, आता काय स्वतः दाऊदने फोन करून सांगावं राष्ट्रवादी वाल्यांना की याचा राजीनामा घ्या?’, असा सवाल निलेश राणेंनी केला आहे.
मुंबई हायकोर्टाने नवाब मलिकचा बेल अर्ज फेटाळला, आता काय स्वतः दाऊदने फोन करून सांगावं राष्ट्रवादी वाल्यांना की याचा राजीनामा घ्या???
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 15, 2022
दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली. यानंतर मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ईडीने दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी याचिकेतून केली होती.
महत्वाच्या बातम्या:
प्रत्येक अधिवेशनात केवळ चर्चा-घोषणा कसल्या करता?; वीज तोडणीवरून फडणवीस आक्रमक
“अशा चित्रपटांमुळे सत्य कळते”- मोदींची ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रतिक्रिया
“मविआ सरकार हे फक्त बोलणाऱ्यांचं…”, प्रविण दरेकरांचा हल्लाबोल
“सगळं कामकाज बाजूला सारून केवळ वीज संबंधींच्या प्रश्नांची चर्चा घडवा”, चंद्रकांत पाटलांची मागणी


