🕒 1 min read
मुंबई: शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र ( Devendra Fadnavis) फडणवीस आज (१५ मार्च) विधानसभेत आक्रमक झाल्याचे दिसून आले. प्रत्येक अधिवेशनात केवळ चर्चा-घोषणा कसल्या करता? असा सणसणीत सवाल करत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले.
“प्रत्येक अधिवेशनात केवळ चर्चा-घोषणा कसल्या करता? त्यातील एकही घोषणा पाळली जात नाही. रोज शेतकरी आत्महत्या करतो आहे. आम्हाला श्रेय नको, हवे तर सत्ताधारी पक्षाची मागणी समजा. पण तातडीने निर्णय जाहीर करा. वीज तोडणे बंद करा आणि शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्या.”, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
किती शेतकरी मेल्यावर चर्चा करणार❓
विजेच्या संदर्भात निर्णय होत नसेल तर आमदारांनी मतदारसंघात जायचे कसे? काय उत्तर द्यायचे शेतकऱ्यांना?
उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले होते.
सभागृहात दिलेल्या वचनांची काही किंमत आहे की नाही❓
(विधानसभा।मंगळवार, दि. 15 मार्च 2022)#Maharashtra pic.twitter.com/6i5xdHUbTT— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 15, 2022
तसेच चर्चा नको, निर्णय करा. रोज शेतकरी आत्महत्या होत असताना सावकारी वसुली सुरू आहे. वीज जोडणी तोडणे बंद करा, ही सर्वांची भावना आहे. आताच्या आता घोषणा करा. तोवर कोणतेही कामकाज करू नका. असा इशारा देत किती शेतकरी मेल्यावर चर्चा करणार? विजेच्या संदर्भात निर्णय होत नसेल तर आमदारांनी मतदारसंघात जायचे कसे? काय उत्तर द्यायचे शेतकऱ्यांना? उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले होते. सभागृहात दिलेल्या वचनांची काही किंमत आहे की नाही? असा संतापजनक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- वाढदिवसाला आलियाला मिळाले धमकेदार गिफ्ट; सविस्तर वाचा
- …त्यामुळे भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडले- राजनाथ सिंह
- ‘आता तरी मलिकांचा राजीनामा घ्या’ – अतुल भातखळकर
- ६२ व्या वर्षी घातला सेक्सी ड्रेस; नीना गुप्ता पुन्हा ट्रोल
- “शेतीला दिवसा वीज द्या अन्यथा घोटाळे बाहेर काढू” – राजू शेट्टी आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
