मुंबई : विधानसभेत सध्या शेतकऱ्यांच्या वीज कापणीचा प्रश्न अधिक जोर धरू लागला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होत प्रत्येक अधिवेशनात केवळ चर्चा-घोषणा कसल्या करता? त्यातील एकही घोषणा पाळली जात नाही. रोज शेतकरी आत्महत्या करतो आहे. आम्हाला श्रेय नको, हवे तर सत्ताधारी पक्षाची मागणी समजा. पण तातडीने निर्णय जाहीर करा. अशी मागणी केली आहे.
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट “विजेचे कनेक्शन तोडणे, प्रायव्हेट वीज कंपन्यांकडून भरमसाट वीजबिल येणे असे विविध प्रश्न आहेत. हा विषय अतिशय गंभीर असून अध्यक्ष महोदयांनी सगळं कामकाज बाजूला सारून केवळ वीज संबंधींच्या प्रश्नांची चर्चा घडवली पाहिजे”, अशी मागणी केली आहे.
विजेचे कनेक्शन तोडणे, प्रायव्हेट वीज कंपन्यांकडून भरमसाट वीजबिल येणे असे विविध प्रश्न आहेत. हा विषय अतिशय गंभीर आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदयांनी सगळं कामकाज बाजूला सारून केवळ वीज संबंधींच्या प्रश्नांची चर्चा घडवली पाहिजे अशी मागणी केली.#vijbil pic.twitter.com/oJLGAD9BoV
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 15, 2022
दरम्यान चर्चा नको, निर्णय करा. रोज शेतकरी आत्महत्या होत असताना सावकारी वसुली सुरू आहे. वीज जोडणी तोडणे बंद करा, ही सर्वांची भावना आहे. आताच्या आता घोषणा करा. तोवर कोणतेही कामकाज करू नका. असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. तसेच किती शेतकरी मेल्यावर चर्चा करणार? विजेच्या संदर्भात निर्णय होत नसेल तर आमदारांनी मतदारसंघात जायचे कसे? काय उत्तर द्यायचे शेतकऱ्यांना? उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले होते. सभागृहात दिलेल्या वचनांची काही किंमत आहे की नाही? असा संतापजनक सवालही फडणवीस यांनी आज विधानसभेत केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “मविआ सरकार हे फक्त बोलणाऱ्यांचं…”, प्रविण दरेकरांचा हल्लाबोल
- “अशा चित्रपटांमुळे सत्य कळते”- मोदींची ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रतिक्रिया
- प्रत्येक अधिवेशनात केवळ चर्चा-घोषणा कसल्या करता?; वीज तोडणीवरून फडणवीस आक्रमक
- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन
- “गांधी कुटुंबाने काँग्रेसच्या नेतृत्वापासून बाजूला व्हावं आणि…”; कपिल सिब्बल यांचे मोठे वक्तव्य


