Share

“अशा चित्रपटांमुळे सत्य कळते”- मोदींची ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रतिक्रिया

Published On: 

नवी दिल्ली: ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. अनेक दिग्गजांकडून चित्रपटाचे कौतुक करण्यात आले आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटावर स्तुतीसुमने उधळली आहेत. “हा खूप चांगला चित्रपट असून असे चित्रपट आणखी तयार  व्हायला हवेत,” असे म्हणत त्यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी जमलेल्या सर्वांना हा चित्रपट पाहण्यास सांगितले. त्याचबरोबर ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तेच आता चित्रपटाला विरोध करत आहेत, असे देखील ते म्हणाले.

मोदी पुढे असेही म्हणाले की, “अशा चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना सत्य कळते आणि भूतकाळातील घटनांना नेमके कोण जबाबदार होते हे देखील समजते. कोणी शोषण केले आणि कोणी चांगले काम केले हे दाखवण्याचा प्रयत्न असे चित्रपट करतात”.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. 1990 मध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेत बळी पडलेल्या कश्मिरी पंडितांवर आधारित ही कथा आहे. चित्रपटात अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांसह अन्य प्रसिद्ध कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्यासह चित्रपटाच्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी मोदींनी कलाकारांचे अभिनंदन करत चित्रपटाचे कौतुक देखील केले होते.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!