Share

NIT Land Scam | भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

NIT Land Scam | नागपूर : नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशना आज पाचवा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून विधानसभेत गोंधळ सुरु आहे. पहिल्या दिवशी कर्नाटक सीमावाद, तर काल दिशा सालियान प्रकरण पुन्हा बाहेर आले. महत्वाच्या, समाजहिताच्या चर्चा बाजूला सारत हा जूना मुद्दा सत्ताधाऱ्यांनी उचलून धरला. या मुद्यावर १० पेक्षा जास्त सत्ताधारी सदस्यांनी भूमिका मांडली. मात्र विरोधकांना बोलण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे जंयत पाटील थेट अध्यक्षांवर संतापले. यावेळी त्यांनी अपशब्दाचा वापर केला. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले. याला विरोध म्हणून आज देखील विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

आज काँग्रेस विधिमंडळच्या कार्यालयात विरोधी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भूखंड घोटाळ्यावर प्रश्न उपस्थित केले. अजित पवार म्हणाले, ८३ कोटींचा भूखंड २ कोटीला देण्यात आला. हे प्रकरण उद्धव ठाकरे सत्तेत असताना भाजप नेत्यांनी समोर आणले होते. भाजपच्या काही नेत्यांनी एकनाथ शिंदेंविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदेंचा गट भाजपला मिळाला. त्यामुळे ते या प्रकरणातून माघार घेत आहेत.

अजित पवार म्हणाले, जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली. काल आम्ही सभागृहाचा त्याग केला. आज देखील आमची तीच भूमिका आहे. जयंत पाटील यांना सभागृहात बसू द्यावे, त्यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी, ही आमची मागणी आहे. मात्र सरकार ही मागणी मान्य करत नाही. त्यामुळे आम्ही आज दिवसभर कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

कर्नाटक मुद्यांवर अजित पवार म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे वेगवेगळे ठराव करत आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी भाषिक आणि बेळगावमधील मराठी लोक नाराज झाले आहे. ही बाब आम्ही अध्यक्षांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. अशा प्रकारचा ठराव महाराष्ट्रात कठोरपणे मांडला गेला पाहीजे. याबाबत महाविकास आघाडीचे एकमत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!