🕒 1 min read
कर्नाटक: कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब मुद्द्यावरून देशात मोठे वादंग उठले आहे. याच पार्श्वभूमीवर आता सिने तारका आणि दिग्गज साहित्यिक मंडळींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री कंगणा राणावत आणि ज्येष्ठ अभिनेत्री तथा माजी राज्यसभा खासदार शबाना आजमी यांच्यात ट्वीटर वर शाब्दिक लढत पाहायला मिळाली.
कंगणाने ट्विट करत असे म्हंटले आहे की, “जर तुमच्यात हिम्मत असेल तर आणि हिम्मत दाखवायची असेल तर अफगाणिस्तान मध्ये जाऊन विना बुरखा फिरून दाखवा. स्वतः ला पिंजऱ्यातून मुक्त करणे शिका” यावर रीट्विट करत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांनी आपले मत माडले आहे. “अफगाणिस्तान एक धार्मिक राज्य आहे. आणि जेव्हा मी शेवटच्या वेळी वाचले होते ते असे की, भारत एक धर्मनिरपेक्ष लोकतांत्रिक प्रजासत्ताक राष्ट्र होते.”
अभिनेत्री शबाना आजमी आणि कंगणा राणावत यांच्यातील या शाब्दिक वादाची सध्या जोरदार चर्चा आहे. शबाना आजमी यांचे पती आणि साहित्यिक, गीतकार जावेद अख्तर यांनी सुद्धा काल प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त केले होते. याच पार्श्वभूमीवर आता कर्नाटक हिजाब प्रकरण, कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. सोमवार फेब्रुवारी १४ पर्यंत त्यावरची सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. उडीपि आणि कर्नाटकातील अनेक शाळा आणि महाविद्यालयात हिजाब घालून येण्यावर बंदी घातली होती त्यावर हा वाद पेटला होता.
महत्वाच्या बातम्या:
- “उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड घोटाळा केला”, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
- एकत्र पाहणीचा अर्थ युती असा होत नाही- अजित पवार
- “आम्ही विरोधात असताना…”; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
- IPL 2022: पंड्या बंधू पुन्हा एकाच संघात खेळणार; कृणाल पंड्याचा ऑक्शनपूर्वी इशारा
- ‘…आधी महापालिकेत निवडून दाखवा’; मोहित कंबोज भारतीय यांचे संजय राऊतांना आवाहन

