Share

“उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड घोटाळा केला”, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या मदतीने महाराष्ट्रात कोविड घोटाळा केला (Uddhav Thackeray commits Kovid scam with the help of Sanjay Raut)असल्याचा आरोप केला आहे.

उद्धव ठाकरेंनी ज्या कंपनीला ब्लॅक लिस्ट केले त्याविरोधात पुणे पोलिसांनी, पुणे महापालिकेनी तसेच पीएमआरडीए ने कारवाई का केली नाही? असा सवाल करत हेल्थ केअर लाईफलाईन या कंपनीने लोकांचा जीव घेतला. फक्त संजय राऊत यांच्या पार्टनरची कंपनी म्हणून कारवाई केली नसल्याचा आरोप किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी केला आहे.

स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांना ब्लॅक लिस्ट केले. रीतसर त्या कंपनीमुळे लोकांचे जीव गेल्याचे रिपोर्ट मध्ये आले आहे. तरी या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलाच कसा? त्यामुळे उद्धव ठाकरेंना लोकांच्या जीवाशी खेळण्याचा कॉन्ट्रॅक्ट राज्यातील जनतेनी दिला आहे का? उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड घोटाळा केला आहे त्यामुळे कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

त्यामुळे मी आज पुन्हा हेल्थ केअर लाईफलाईन या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी पुणे महापालिकेला करणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. तसेच गेल्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने १०० गुंड पाठवले होते, त्यावेळी कारवाई होऊ दिली नाही. बघतो कशी कारवाई करत नाही, असा इशाराही सोमय्यांनी दिला आहे. तसेच संजय राऊतला जाब द्यावाच लागणार. असेही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!