मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे आज(११ फेब्रु.)पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात दौऱ्यावर होते. आदित्य यांच्यासह मतदारसंघाची पाहणी केल्यानंतर दोन्ही नेते दादरमध्ये (Dadar) चैत्यभूमीजवळ पाहणी करण्यासाठी गेले होते. तद्पश्चात युतीच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, या चर्चांवर आता अजित पवारांनी पूर्णविराम लावला असून एकत्र पाहणीचा अर्थ युती असा होत नाही, असे पवारांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अजित पवार म्हणाले की,‘एकत्र पाहणीचा अर्थ युती असा होत नाही. तसेच प्रत्येकाला आपआपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. परंतु निवडणुकीतील युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होईल’, असे यावेळी अजित पवार म्हणाले.
राज्याचे पर्यावरण मंत्री @AUThackeray यांच्यासह दादर येथील चैत्यभूमी परिसर, वरळी, वरळी कोळीवाडा, महालक्ष्मी, हिल टॉप लेन आदी परिसरातील विकासकामांची आज पाहणी केली. pic.twitter.com/2QwqjCXrQD
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 11, 2022
दरम्यान, दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत होते, तर त्यांच्या शेजारच्या सीटवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बसले होते. अजित पवार हे नेहमीच आपल्या मतदारसंघात कामाची पाहणी करण्याकरिता तसेच उद्घाटनाच्या कार्यक्रमाकरिता सकाळीच हजर होत असतात. तसेच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वेगवेगळ्या प्रकल्पांच्या उद्घाटन केले आहेत. ‘पुढे चला मुंबई’ अशी घोषणाही त्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरेंच्या या सोबतच्या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या:
- मास्क आता बंद होणार?; अजित पवारांनी केला खुलासा
- IPL 2022: IPL मेगा ऑक्शन आधी पंजाब संघाला मोठा धक्का; “ दुआ मे याद रखना” म्हणत दिग्ग्जाचा राजीनामा
- ‘…आधी महापालिकेत निवडून दाखवा’; मोहित कंबोज भारतीय यांचे संजय राऊतांना आवाहन
- IPL 2022: पंड्या बंधू पुन्हा एकाच संघात खेळणार; कृणाल पंड्याचा ऑक्शनपूर्वी इशारा
- “आम्ही विरोधात असताना…”; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला


