मुंबई: हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या हि बंधूंची जोडी मुंबई इंडियन्ससाठी अनेक वर्षे एकत्र खेळले आहेत. मुंबईने मात्र या दोघांमधील एकालाही रिटेन केले नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये नवीन आलेला संघ गुजरात टायटन्सने मात्र हार्दिकला खरेदी करत त्याला कर्णधार बनवले आहे. मात्र कृणाल मेगा ऑक्शनचा भाग असणार आहे. हे दोघे बंधू एकमेकांसमोर खेळण्याची शक्यता होती. पण कृणालने याबाबत वेगळी प्रतिक्रिया दिली आहे.
कृणाल आणि हार्दिक पुन्हा एकदा सोबत खेळू शकतात,असा अप्रत्यक्ष इशारा कृणालने नुकताच बोलताना दिला आहे. आयपीएल (IPL) मेगा ऑक्शन आधी दिलेल्या एका मुलाखतीत कृणाल म्हणाला ” मला सध्या काहीच माहीत नाही. जर हार्दिकला माझ्यासोबत खेळायची इच्छा असेल तर तो मला ऑक्शनमधून निवडू शकतो. नाहीतर मी कुठेही जायला आनंदी आहे. आमचं नातं खूप वेगळं आहे. आम्ही भाऊ असूनही खेळताना विविध संघांसोबत आमचा प्रामाणिकपणा, निष्ठा यात चढ-उतार होत नाही. नैतिकदृष्ट्या जे काही योग्य आहे, ते आम्ही करतो आणि ते आजपर्यंत तसेच आहे.”
आयपीएल २०२२ मध्ये हार्दिक पंड्या पहिल्यांदा कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. अनेक वर्ष तो रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांच्या नेतृत्वात त्याने बराच वेळ घालवला आहे. तो सध्या फॉर्मशी झगडत आहे. मात्र कर्णधार म्हणू नवीन इंनिंग करणाऱ्या हार्दिकवर कृणालचा पूर्ण विश्वास आहे. कृणाल आणि हार्दिक हे पंड्या बंधू अगदी सुरुवातीपासून सोबत खेळले असल्याने हार्दिक कृणालला नक्की आपल्या संघात घेईल असा तर्क क्रिकेट रसिकांनी लावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…आधी महापालिकेत निवडून दाखवा’; मोहित कंबोज भारतीय यांचे संजय राऊतांना आवाहन
- IPL 2022: IPL मेगा ऑक्शन आधी पंजाब संघाला मोठा धक्का; “ दुआ मे याद रखना” म्हणत दिग्ग्जाचा राजीनामा
- मास्क आता बंद होणार?; अजित पवारांनी केला खुलासा
- “कॉंग्रेसवाले मत लेलो मोदीजीसे पंगा…” रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी
- हम साथ-साथ है ! आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अजित पवारांचा दौरा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

