Share

“आम्ही विरोधात असताना…”; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज राजभवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दरबार हॉलचं उद्घाटन झालं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना भाजपवर जोरदार टोलेबाजी केली आहे. यावेळी कार्यक्रमात राष्ट्रपतींसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, नुतनीकरण केलेल्या वास्तुसाठी मला आनंद होत आहे. या नवीन वास्तुमध्ये आनंददायी घटना घडाव्यात अशी अपेक्षा आहे. आपलं राजभवन हे देशातील सर्वोत्तम असेल. ५० एकरात हे राजभवन आहे. इथली हवा ही थंड असते. राजकीय हवा कशी ही असू द्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला (Uddhav Thackeray Slams BJP). उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही विरोधात असताना राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. रोज येत नव्हतो, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!