Share

Russia Ukraine war: अमेरिका भारतावर निर्बंध लावण्याच्या तयारीत? ; जाणून घ्या काय आहे कारण…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सध्या युरोप खंडात युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO मध्ये सहभागी होऊ नये या करता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. रशियाचे लष्कर हे जगातील सर्वात ताकदवान लष्करापैकी एक आहे. तर युक्रेनचे लष्कर तेवढे ताकदवान नाही.

जगातील प्रमुख देश त्यांना जमेल तसे युक्रेन देशाला मदत करत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत, संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार सभेत जगातील अनेक देशांनी रशिया आणि व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात मतदान केले आहे.  तर जगातील काही प्रमुख देशांनी रशियाला जमेल त्याप्रकारे रशियाला आर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध संघटनांमध्ये झालेल्या मतदानात गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला होता. तर रशियाकडून S-४०० ही अत्याधुनिक मिसाईल प्रणाली पण भारत विकत घेत आहे. भारताच्या शेजारी चीन आणि पाकिस्तान सारखे आक्रमक देश असताना भारताने रशियाकडून  S-४०० ही अत्याधुनिक मिसाईल प्रणाली विकत घेणे हे संयुक्तीत ठरणारे आहे. मात्र यामुळे प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या पाश्चिमात्य देशांना मात्र त्रास होत आहे. त्यातच आज अमेरिका आगामी काही दिवसात भारतावर आर्थिक निर्बंध लावू शकते अशी धमकी अमेरिकेचे अधिकारी डोनाल्ड लू यांनी दिली आहे.

या बाबत अधिक माहिती देताना अमेरिकेचे डोनाल्ड लू म्हणाले कि,” भारताचे आणि अमेरिकेचे सर्वच क्षेत्रात उत्तम संबंध आहेत. गेल्या काही दशकात आर्थिक, लष्करी संबंधात वाढ झाली आहे. तसेच रशिया आणि भारत यांच्यात सुद्धा चांगल्या पातळीवर संबंध आहेत. मात्र रशियाला या क्षणी जगात कसे एकटे पाडता येईल याचाच आम्ही विचार करत असताना ; भारताने संयुक्त राष्ट्र संघात  झालेल्या वेग वेगळ्या मतदानात गैरहजर राहून अप्रत्यक्षरीत्या रशियालाच मदत केली आहे याचा आम्हाला धक्का बसला असून म्हणूनच आम्ही भारतावर आर्थिक निर्बंध लावता येतील का याचा विचार करत आहोत. मात्र अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लावले तरी आमच्या संबंधांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये याची आम्ही पुरेपूर खात्री बाळगणार आहोत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!