Share

IND vs SL : दुर्दैव..! ऐतिहासिक कसोटीत विराट अपयशी; शतक तर हुकलच सोबतच…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय संघ श्रीलंका विरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. भारतासाठी हा सामना अनेक कारणांनी विशेष ठरणारा आहे. रोहित शर्मा कर्णधार म्हणून प्रथमच कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे . तर विराट कोहलीसाठी हा त्याच्या कारकिर्दीतील १००वा कसोटी सामना ठरला आहे. या सामन्यात विराट कोहली एक मोठी खेळी करेल कदाचित तो संधी साधत शतक करेल अशी आशा चाहत्यांना होती मात्र विराट पहिल्या डावात ४५ धावा करत पॅव्हेलियन मध्ये परतला. अवघ्या ५ धावांनी त्याचे अर्धशतकही राहिले.

नाणेफेक जिंकत भारताने आधी फलंदाजी करायचा निर्णय घेतला. रोहित शर्मा (rohit sharma) आणि मयंक अग्रवाल (mayank agrawal)  यांनी भारतासाठी सलामीला चांगली सुरुवात करून दिली. मयंक आणि रोहित दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर हनुमा विहारी आणि विराट कोहली यांनी मिळून भारतासाठी अर्धशतकीय भागीदारी केली. हनुमा विहारीने (hanuma vihari) अर्धशतक झळकवल्यावर विराटही (virat kohli) अवघ्या काही धावा त्यापासून लांब होता. चाहत्यांना अर्धशतकाच्या पुढे शतक दिसत असतानाच लसिथ एम्बुल्देनियाच्या चेंडूने विराटचा घात केला आणि विराट पहिल्या डावात ४५ धावांवर माघारी परतला आहे.

विराट कोहलीचे शेवटचे शतक जवळपास २ वर्षांपूर्वी आले होते. कोरोनाच्या परिस्थितीनंतर चाहत्यांनी विराटचे ७१ शतक या सामन्यात येईल त्या सामन्यात येईल अशी अपेक्षा बांधणी अजूनही सुरु ठेवली आहे. विराट १००व्या कसोटी सामन्याची संधी साधत शतक झळकवेल अशी आशा अजूनही चाहत्यांना आहे. पहिल्या डावात विराटने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडे शतक झळकावण्यासाठी दुसऱ्या डावात पुन्हा एक संधी आहे. त्याच्या बॅटला गवसलेला सूर आणि चाहत्यांच्या इच्छा शक्तीने विराट खरच १००व्या सामन्यात शतक झळकवेल का याची वाट भारतीय क्रिकेटरसिक बघत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!