मुंबई: मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने चालवलेल्या स्वाक्षरी मोहिमेवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवळ यांनी देखील सही केली आहे. दरम्यान यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भांबावलेल्या परिस्थितीत सही केली असेल, असे म्हणत आव्हाडांनी उपाध्यक्षांची पाठराखण केली आहे.
दरम्यान काल देखील अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता.