मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चिटपट आज प्रदर्शित होत आहे. अनेकजण या चित्रपटाची उत्सुकतेन वाट पाहत होते. झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन, आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरू यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा साऊथमधील सुपरस्टार धनुषला दाखवण्यात आला. नागराजचा हा सिनेमा बघून धनुष पूर्णपणे भारावला आहे. त्याचा हा सिनेमा पाहण्याचा अनुभव खूप जबरदस्त आहे.
आधी आमिर खानने नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाची स्तुती केली. त्यानंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने ‘झुंड’वर कौतुकाचा वर्षाव केला आहे. धनुषने नुकताच हा चित्रपट पाहिला असून त्यातील कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने त्याचं मन जिंकल्याची भावना त्याने व्यक्त केली. “नागराज मंजुळेंचं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे”, असं तो म्हणाला. ‘झुंड’ हा नागराज यांचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. चित्रपट बनवताना त्यांच्यासमोर अनेक आर्थिक अडचणी आल्या, त्यामुळे प्रदर्शनही पुढे ढकलावं लागलं. अखेर टी सीरिजच्या भूषण कुमार यांनी कथा ऐकल्यानंतर चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं.
“नागराज मंजुळे यांचा आवाज चित्रपटांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे, दुर्लक्ष करता येणार नाही असं त्याचं काम आहे. या चित्रपटातील तांत्रिक गोष्टींविषयी मी हजार शब्द बोलू शकतो, की हे अप्रतिम आहे, ते खूप छान आहे. पण अखेरीस या चित्रपटातील भावना तुमचं मन जिंकून जाते. हा अनुभव सर्वांनी घेण्यासारखा आहे. हा चित्रपट म्हणजे उत्कृष्ट नमुना आहे. हा चित्रपट पाहिल्याचा, ती जादू अनुभवल्या मला खूप आनंद आहे. या चित्रपटातील मुलांनी माझं मन जिंकलं आहे. मी नि:शब्द झालोय. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे,” असं धनुष म्हणाला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

