Share

कलम ३७० : २२ दिवसांपासून काश्मिरातील सासू-सासऱ्यांशी संपर्क झाला नाही

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर देखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. परंतु कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी याला विरोध दर्शवला आहे तर काहींनी समर्थन दर्शवले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी कलम ३७० हटवल्या वरून भाष्य केले आहे. त्यांनी केंद्रातील भाजप सरकारने हा निर्णय अमानुष पद्धतीने घेतला असून त्यामुळे तेथील जनजीवन ठप्प झाले आहे. दूरध्वनी सेवा व प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे असं विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना मातोंडकर यांनी काश्मीरमध्ये आपले सासू-सासरे राहतात, मागील २२ दिवसांपासून त्यांच्याशी आपला संपर्क झाला नसून त्यांना मधुमेहासह इतर आजार आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती पाहता त्यांना योग्य ती औषधी मिळाली की नाही, याबाबत आम्हाला काहीही माहिती मिळाली नसल्याचं मातोंडकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, लोकसभेत यश मिळाले नाही तरी आपण पूर्ण ताकदीने कामाला लागलो असून पक्षाने विधानसभा निवडणूक लढवायला सांगितले तर आपण जरूर विचार करू, असंही मातोंडकर यांनी सांगितले. लोकांनी आपल्याला भरभरून प्रेम दिले. त्यांच्यासाठी काहीतरी करावे या विचाराने आपण राजकारणात प्रवेश केला असल्याचंही मातोंडकर यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!