🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या राजकीय यात्रा आता आक्रमक होताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेने आणि भाजपच्या महाजनादेश यात्रेने राज्यात धुमाकूळ घातला आहे. या यात्रांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. तर आता भाजपनेते आणि केंदीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला प्रेतांची यात्रा अशी उपमा दिली आहे. यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील पलटवार केला आहे.
ही शिवस्वराज्य यात्रा नसून प्रेतयात्रा आहे,’ अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. रावसाहेब दानवेंच्या या टीकेला धनंजय मुंडे उत्तरले म्हणाले की, ‘रावसाहेब दानवेजी तुम्ही बरोबर बोललात. भाजप-सेनेच्या जुलमी, असंवेदनशील, शेतकरीविरोधी सरकारची ही अंतिम यात्रा आहे. पण तुमची एक चूक दुरुस्त करतो. या हुकूमशाही सरकारला शेवटचा नमस्कार करण्यासाठी लोक महाजनादेश यात्रेला गर्दी करत आहेत, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.
दरम्यान रावसाहेब दानवे हे आपल्या गावरान भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. जालना इथल्या महाजनादेश यात्रेदरम्यान त्यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर त्यांच्या इरसाल भाषेत भाष्य केलं. त्यांनी कार्यकर्त्यांसमोर राष्ट्रवादीच्या यात्रेची प्रेतयात्रा म्हणून खिल्लीही उडवली. तसंच राष्ट्रवादीच्या या यात्रेकडे परकीयांसोबत स्वकियांनीही पाठ फिरलवल्याचं म्हणत जोरदार टीका केली.
- अवधूत तटकरेंना पक्ष प्रवेशासाठी शिवसेनेकडून ग्रीन सिग्नल ?
- मंत्रिपदासाठीचं शिवेंद्रराजे भोसलेंनी केला भाजपमध्ये प्रवेश : जयंत पाटील
- सत्तेत असताना जनतेशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती : मुख्यमंत्री
- उदयनराजे आतून आमच्या बरोबरचं, रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
