Share

इंदापूरच्या जागेबाबत निर्णय घेऊ शकत नाही, मी केवळ पक्षाचा एक मावळा : खा. कोल्हे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागेवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये कलगीतुरा रंगणार असल्याचं दिसत आहे. कारण दोन्ही पक्षांनी इंदापूरच्या जागेवर हक्क सांगितला आहे. या जागेवरून खा. अमोल कोल्हे यांनी देखील भाष्य केले आहे. इंदापूरचे तिकीट कोणाला देयच हे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार ठरवतील. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील केवळ एक मावळा आहे. जर, पवारसाहेबांनी सांगितलं तर मी दुसऱ्या क्षणाला राजीनामा देईल असे, भाष्य अमोल कोल्हे यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेली शिवस्वराज्य यात्रा आज इंदापूर येथे आली. यावेळी अमोल कोल्हे यांच्या भाषणावेळी एकाने विद्यमान आ. दत्ता भारणे यांचे तिकीट फिक्स करा अशी मागणी केली. यावर अमोल कोल्हे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, मी तिकीट फिक्स करणारा कोणी नाही. मी राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता आहे. खासदारकीचा, सत्तेचा मला मोह नाही. उद्या पवार साहेबांनी राजीनामा दे, असं सांगितलं. तर दुसऱ्या क्षणाला मी खासदारकीचा राजीनामा देईल, असेही कोल्हे यांनी भरसभेत म्हटलं. तसेच, दत्ता मामांचं तिकीट फिक्स की नाही मी सांगणार नाही. पण, येणाऱ्या विधानसभेला भाजप शिवसेना पुन्हा नाही, तर यंदा शिवस्वराज्य येणार असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत इंदापूरच्या उमेदवारीवरून कॉंग्रेस आघाडीत वाद निर्माण होणार असल्याचं दिसत आहे.कारण राष्ट्रवादीचे विद्यमान आ. दत्ता भरणे आणि कॉंग्रेसचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील या दोन्ही कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी इंदापूरच्या उमेदवारीवर हक्क सांगितला आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींनी देखील इंदापुरच्या जागा आपल्याकडे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि पवार यांच्यात पुन्हा एकदा तिढा निर्माण होणार असल्याचं दिसत आहे.

तसेच विधानसभेला तरी राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडेल, या आशेवर हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंना मदत केली होती. मात्र लोकसभेच्या दगडा खालून हात निघताचं पवार कुटुंबीयांनी विधानसभेचे गाजर दाखवून हर्षवर्धन पाटील यांना फसवल असल्याचं बोललं जात आहे. निवडून आलेले आमदार हेच आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र राहणार असल्याचं पवारांनी म्हटलंय. त्यामुळे इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!