Share

‘३७० हटविले, तसे आरक्षणही हटवतील’, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती

Published On: 

पुणे : ‘मेहबुबा मुफ्ती यांच्या ‘पीडीपी’ पक्षाचा वापर करून भाजपने काश्मीरमध्ये पाय रोवले आणि कलम ३७० रद्द केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, झारखंड आणि हरयाणाच्या निवडणुका संपल्यावर भाजप आरक्षण संपविल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आरक्षित वर्गाने सावध होऊन विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करावा असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केले आहे.

वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यात आयोजित वडार समाजाच्या सत्ता संपादन मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत केलेले वक्तव्य म्हणजे आरक्षण संपविण्याचा प्रयत्न असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील निवडणुका संपल्यानंतर पूर्ण सत्ता हातात आल्यानंतर आरक्षण काढून घेण्यात येईल असा दावा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. आरक्षित वर्गाने सावध होण्याची हीच वेळ आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!