Share

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी कळताच शेहनाजला बसला धक्का

Published On: 

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी निधन झाले आहे. मुंबईतील कूपर हॉस्पिटलने सिद्धार्थच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. 40 वर्षीय सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या बातमीनंतर सर्वांनाच धक्का बसला.

छोट्या पडद्यावरील सिद्धार्थने कमी काळात अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्याच्या निधन झाल्याच्या वृत्ताने सर्वचजण दु:ख व्यक्त करत आहेत. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रत्येकाला सिद्धार्थच्या मृत्युच्या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. सिद्धार्थच्या निधनाची बातमी ऐकून त्याची मैत्रिण आणि बिग बॉसमधील कोस्टार शेहनाज गिलला धक्का बसला आहे. यावेळी ती शुटींगमध्ये व्यस्त होती. मात्र हि माहिती समजल्यानंतर तिने शुटींग थांबवले आणि मुंबईकडे रवाना झाली.

https://www.instagram.com/reel/CIC5rfiJbFX/?utm_source=ig_web_copy_link

सिद्धार्थ आणि शेहनाज ही जोडी ‘बिग बॉस १३’च्या घरात या दोघाची चांगलीच चर्चा रंगली होती. ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या मात्र त्याबाबत त्यानी कोणताही खुलासा केला नव्हता. नुकतेच ते दोघे बिग बॉस ओटीटीमध्येही गेल्या आठवड्यात दिसले होते.

सिद्धार्थचा मृत्यू उपचारापूर्वीच झाला असून त्याने झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली असल्याची माहिती समोर आली त्यामुळे आता लोकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहे. सिद्धार्थने घेतलेल्या गोळ्यांनंतर तो झोपेतून उठलाच नाही. त्यामुळे सेवन केलेल्या औषधांमुळेच त्याचा मृत्यू झाला का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!