मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे काल बुधवारी रात्री राजभवनावर गेले होते. राज्य सरकारने १२ सदस्यांची राज्यपाल नियुक्तीसाठी नावे पाठवून ९ महिने झालेत. राज्यपालांनी या आमदारांची नियुक्ती लवकरात लवकर करावी यासाठी महाविकास आघाडीतील हे तीन दिग्गज नेते राज्यपालांना भेटले असून त्यांनी राज्यातील इतर महत्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा केली आहे.
राज्य सरकारचे शिष्टमंडळ भेटल्याने १२ आमदारांच्या नियुक्यांचा तिढा सुटणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, आता हा तिढा अधिक गुंतत चालला असल्याचे चित्र समोर येत आहे. कारण, काल राज्यपाल आणि राज्य सरकार मध्ये झालेल्या बैठकीत आमदारांची पुन्हा यादी देण्यात आली आहे. या नव्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला असला तरी राजू शेट्टी हे सरकार विरोधात पदयात्रा करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्या नावाचा पत्ता कट केल्याचे समजतेय.
तसेच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या नावावरही राज्यपालांचा आक्षेप असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला कशी काय मान्यता द्यावी, असा प्रश्न राज्यपालांच्या कार्यालयासमोर आहे. राजू शेट्टी यांच्यावरही शेतकरी आंदोलनाचे अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या नावाबाबतही राजभवनाकडून फेरविचार करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे १२ आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी आणि एकनाथ खडसे यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.
१२ आमदारांच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात गेले काही दिवस संघर्ष सुरू आहे. त्यात आता दोन नावांवर जर राज्यपालांकडून आक्षेप घेतला गेला असेल तर मग पुन्हा त्यांची नियुक्ती रखडणार हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडी सरकारला सध्या हे परवडण्यासारखे नाहीये. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून हे दोन नावे वगळण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा अंदाज आहे.
ही होती पूर्वीची यादी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. तर, काँग्रेसकडून रजनी पाटील, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार मुझफ्फर हुसैन आणि अनिरूद्ध वनकर यांचा समावेश आहे. तसेच, शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानुगडे पाटील यांच्या नावांचा समावेश करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; न्यायालयाची सरकारला कायदा करण्याचा सूचना
- मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती घेणार आज राष्ट्रपतींची भेट
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- रिलायन्स जिओचे खास प्लॅन्स; Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मिळणार मोफत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

