बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच एक फेसबूक पोस्ट लिहून आपण नेमके कुठे आणि का गेलो आहोत यावरुन पडदा उचलला. ‘हा आठवडा नक्कीच सर्व जण म्हणत असतील ‘पंकजा कुठे आहे?’, असं म्हणत त्यांनी एक उलगडा केला. खरेतर तर पंकजा यांचा मुलगा आर्यमन हा उच्च शिक्षणासाठी बोस्टनमध्ये गेला आहे. त्याला सोडण्यासाठी पंकजा त्याच्यासोबत गेल्या आहेत. याची माहिती देणारी त्यांनी एक फेसबूक पोस्ट लिहिली.
मात्र, त्यानंतर काही उसतोड कामगारांनी त्यांचे अभिनंदन करत जळजळीत वास्तव समोर आणणाऱ्या काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. लक्ष्मण खेडकर या व्यक्तीने पंकजा मुंडेंना उद्देशून लिहिलेली ही पोस्ट स्वत: पंकजा मुंडे यांनी शेअर केली आहे. यावर त्यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. यामध्ये त्यांनी ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न समोर ठेवला आहे.
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर स्वत:ला पंकजा मुंडे यांनी ही पोस्ट रिशेअऱ करीत त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेत असल्याचं आश्वासनही दिलं आहे.
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=3027973054115796&id=100007093932294
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
मा.पंकजा मुंडे या स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कन्या, ऊसतोड कामगारांच्या कार्यक्षम आणि संघर्षशील नेत्या, त्यांनी त्यांचा मुलगा परदेशात बोस्टनला शिक्षणासाठी पाठवलाय अशी बातमी सोशल मीडीयावर वाचली, आनंद वाटला, त्या बद्दल आमच काहीच म्हणणं नाहीय, त्यासाठी एक जबाबदार आई म्हणून पंकजाताई तुमचं खुप खुप अभिनंदन आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा मुलगा आर्यमनला ही मनापासून शुभेच्छा.
पंकजाताई ,आमचं फक्त एवढचं म्हणणं आहे की ऊसतोड मजूरांच्या नेत्या या नात्याने, ऊसाच्या फडात, पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजूरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का ते ही जरा पाहा,लोकांची मुंडके मोडून स्वत:ची घर भरणा-या बरबटलेल्या बाकीच्या बोलघेवड्या पुढा-यांकडून आम्हाला अपेक्षा नाहीयेत. राज्याची नसली तरी केंद्रातली सत्ता तुमच्या हातात आहे. तुमच्या लहान भगिनी मा. प्रितमताई मुंडे या खासदार आहेत. तुम्ही स्वतः बहुमतात सत्तेत असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहात. करा काही तरी, नाही तर असं नको व्हायला की तुमची लेकरं परदेशात शाळेत अन आमची कायम ऊसाच्या फडात..
https://www.facebook.com/PankajaGopinathMunde/posts/4321858051233056
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
जरूर लक्ष्मण मी ते करेन … आम्ही पहिल्यांदा अमेरीका इथे आलो ते ही ऊस तोडणारी विमल (तेव्हा ते ऊसतोड कामगार होते) आणि तश्याच लढण्यास तयार राहून यश मिळवणाऱ्या सख्या घेऊन… आता त्या योजनेचे चित्र बदलले असावे मी incharge नाही राहिले .. प्रत्येकाची लढाई भिन्न असते कोणाची जगण्याची आणि कोणाची जगवण्याची .. मी अनेक ऊसतोड मजुरांना त्यांच्या मुलाच्या शिक्षण घेण्यासाठी मदत करत होते, करते आणि करत राहणार.. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मधून गरजूंच्या शिक्षणाला मदत,आपत्ती ग्रस्त संसाराला मदत, रुग्णांच्या ईलाज साठी मदत, covid 19 मध्ये covid centre, पूर ग्रस्त लोकांसाठी मदत फेरी, हे सर्व वंचित आणि शोषित यांच्या साठी करणे म्हणजे जगणे आहे..आणि कष्ट आणि मेरिट यांची सांगड घातल्या शिवाय काहीही नाही होऊ शकत..
महत्त्वाच्या बातम्या
- गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; न्यायालयाची सरकारला कायदा करण्याचा सूचना
- मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती घेणार आज राष्ट्रपतींची भेट
- तुमच्या बजेटमध्ये मिळणार सेडान कार; जाणून घ्या किमंत
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- राम गोपाल वर्मांचा तो व्हिडिओ झाला व्हायरल ; म्हणे तो मी नव्हेच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

