जालना : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली तसे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. परंतु, गेल्या काही दिवसांत ठराविक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांत पुन्हा वाढ होऊ लागल्याचे निदर्शनास आल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दोन दिवसांपूर्वी निर्बंध काही अंशी कडक करण्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यानंतर जालना येथे माध्यमांशी संवाद साधताना टोपे यांनी राज्य सरकारच्या वतीने भूमिका स्पष्ट केली आहे.
‘सध्या लॉकडाऊनचा कोणताही विषय नाही. आम्ही यापूर्वीही यासंदर्भात सांगितलेलं आहे. जो पर्यंत सातशे मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन लागत नाही तो पर्यंत लॉकडाऊन किंवा निर्बंध लावले जाणार नाहीत,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. या बाबतच्या सूचना मागच्याच महिन्यात देण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले. त्यामुळे जेव्हा सातशे मेट्रिक टन पेक्षा ऑक्सिजन लागेल त्यावेळी राज्यात निर्बंध लागू शकतात असे ते म्हणाले.
कोरोना बाधितांची संख्या घटली असली तरी जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या तपासण्या वाढवाव्यात, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मास्क वापर, सुरक्षित अंतराचे पालन करण्यासह लसीकरणही महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; न्यायालयाची सरकारला कायदा करण्याचा सूचना
- मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती घेणार आज राष्ट्रपतींची भेट
- ‘मुंबईचे पाप काय, की त्यांना शिवसेनेसारखा पक्ष मिळाला’, निलेश राणेंनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- राम गोपाल वर्मांचा तो व्हिडिओ झाला व्हायरल ; म्हणे तो मी नव्हेच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

