मुंबई : मागील दोन दिवसांत मराठवाड्यातील परभणी, बीड, औरंगाबाद तसेच जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होता. यामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले आहे. या पावसाने अनेक ठिकाणची वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही तालुक्यात जमिनी खरडून वाहून गेल्या. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. नुकसान झालेले जिल्हे, गावं यांचे पंचनामे तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही तालुक्यात जमिनी खरडून वाहून गेल्या. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. नुकसान झालेले जिल्हे, गावं यांचे पंचनामे तातडीने कारवाई करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत- ना. @AjitPawarSpeaks pic.twitter.com/VOcMkFiJel
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) September 2, 2021
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही तालुक्यात जमिनी खरडून वाहून गेल्या. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. नुकसान झालेले जिल्हे, गावं यांचे पंचनामे तातडीने कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्या-त्या जिल्ह्यातील पालकमंत्री पाहणीसाठी गेले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. कन्नड घाटातील दरडी कोसळल्याने प्रचंड नुकसान झाले असून सध्या रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू आहे’, अशी माहितीही पवार यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडी सरकार करणार सहकार कायद्यात दुरुस्ती
- ‘राज्यात तोपर्यंत लॉकडाऊन नाहीच!’, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे वक्तव्य
- ‘तुमची लेकरं परदेशात, आमची कायम ऊसाच्यात फडात’, व्हायरल पोस्टला पंकजा मुंडेंनी दिले उत्तर
- मोठी बातमी! १२ आमदारांच्या यादीतून एकनाथ खडसे, राजू शेट्टींना वगळले?


