Share

१२ आमदारांच्या यादीतून राजू शेट्टींचा पत्ता कट?, अजित पवार म्हणाले..

Published On: 

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे काल बुधवारी रात्री राजभवनावर गेले होते. राज्य सरकारने १२ सदस्यांची राज्यपाल नियुक्तीसाठी नावे पाठवून ९ महिने झालेत. पण आता राज्य सरकारचे शिष्टमंडळ भेटल्याने १२ आमदारांच्या नियुक्यांचा तिढा सुटणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, आता हा तिढा अधिक गुंतत चालला असल्याचे चित्र समोर येत आहे.

कारण, काल राज्यपाल आणि राज्य सरकार मध्ये झालेल्या बैठकीत आमदारांची पुन्हा यादी देण्यात आली आहे. या नव्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू शेट्टी यांच्यासह दोन जणांची नावे वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नाव बदललं ही चर्चा मी माध्यमात बघितली. विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. त्याची शहानिशा केली जात आहे.’

‘नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल तर त्याला नेमलं जात नाही अशी नवी चर्चा नव्याने सुरू झाली आहे. यात तथ्य आहे का याची शहानिशा आम्ही करतोय. जर का अडचण आली तर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. मात्र अरुण जेटलींचा पराभव झाल्यानंतर त्यांना नरेंद्र मोदींनी राज्यसभेवर घेतलं होतं’ असे अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने त्यांच्या दिलेल्या यादीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि प्रा. यशपाल भिंगे यांची नावे आमदारकी सुचवण्यात आली आहे. मात्र, शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून २०१९ ची निवडणुकीत पराभूत झाले होते. तर तत्कालीन वंचितचे उमेदवार यशपाल भिंगे हे नांदेड लोकसभातून हरले होते.

दरम्यान, १२ आमदारांच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात गेले काही दिवस संघर्ष सुरू आहे. त्यात आता काही नावांवर जर राज्यपालांकडून आक्षेप घेतला गेला असेल तर मग पुन्हा त्यांची नियुक्ती रखडणार हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडी सरकारला सध्या हे परवडण्यासारखे नाहीये. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून ही नावे वगळण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा अंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!