मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ज्या तीन कृषी कायद्यांमुळे (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते ते तीन कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मागे घेतल्याची घोषणा केली आहे. दीड वर्षापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर यश आले आहे. आज सकाळी देशाला संबोधित करत पंतप्रधान मोदींनी हे कायदे मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही मोदी सरकारच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. ‘आता सरकारला उपरती झाली, आणि हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली. त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला चांगलेच टोमणे मारले आहेत.
शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून मोदींनी कृषी कायदे रद्द केलेत; शरद पवारांची प्रतिक्रिया
- …परंतु ही केवळ यूपी, पंजाबच्या निवडणुकीसाठीची नौटंकी तर नाही ना?- विजय वडेट्टीवार
- शेतकाऱ्यांसामोर या आधीही घ्यावी लागली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींना माघार
- ‘हे’ दुःखद, लज्जास्पद, पूर्णपणे अन्यायकारक; केंद्र सराकराच्या निर्णयावर कंगना नाराज
- ‘त्या गोष्टीवर काम करायला हवे’; गौतम गंभीरने सांगितली सूर्यकुमारची मोठी कमजोरी


