Share

…परंतु ही केवळ यूपी, पंजाबच्या निवडणुकीसाठीची नौटंकी तर नाही ना?- विजय वडेट्टीवार

Published On: 

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात नुकतीच त्यांनी तीन कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली आहे. दरम्यान, माध्यमांशी संवाद साधतांना या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी मोदींवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यावेळी बोलत असतांना वडेट्टीवार म्हणाले की,’पंतप्रधानांनी वादग्रस्त कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याचं आम्ही स्वागत करतो. पण उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका पाहून तर ही खेळी केली नाही ना? आज कायदे मागे घेतले उद्या सत्तेत आल्यावर पुन्हा हे कायदे आणले तर जाणार नाही ना? केवळ निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठीचा हा फंडा तर नाही ना? असे सवाल करतानाच निवडणुकीच्या अगोदर महागाई कमी करायची, काही निर्णय घ्यायचे आणि सत्तेत आल्यावर पुन्हा तेच निर्णय राबवायचे ही मोदी सरकारची खेळी राहिली आहे, त्यामुळे आमचा भाजपवर विश्वास नाही.’

दरम्यान, या आंदोलनात ६०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याला जबाबदार मोदी सरकारच आहे. आपल्याचमुळे हे शेतकरी दगावल्याची जाहीर कबुली देत त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. कृषी कायदे रद्द करायला इतका उशीर का केला? ६०० शेतकऱ्यांचा बळी घेण्याची काय गरज होती. पूर्वीच कृषी कायदे रद्द केले असते तर शेतकऱ्यांचा विरोध झाला नसता. ग्रामीण भागातील शेतकरी सरकार विरोधात पेटून उठली आहे. त्यांचा भडका उडाला आहे. महागाईमुळे जनता आणि शेतकरी त्रस्त आहे. केवळ पाच दहा रुपयांनी पेट्रोल कमी केल्याने महागाई नियंत्रणात येणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!