Share

‘त्या गोष्टीवर काम करायला हवे’; गौतम गंभीरने सांगितली सूर्यकुमारची मोठी कमजोरी

Published On: 

जयपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादवने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमुळे त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले आणि त्यानेही जबरदस्त कामगिरी केली. त्याने 40 चेंडूत शानदार 62 धावा केल्या.

सूर्यकुमार यादवच्या उत्तम कामगिरी नतंरही सुर्यकुमार यादव कुठे कमी पडतो याबाबत गौतम गंभीरने सांगितली आहे. गौतम गंभीरने म्हटले आहे की, ‘सूर्यकुमार यादव फलंदाज म्हणून खूप चांगला आहे पण तो सामने पूर्ण करू शकत नाही आणि त्याला ही कला शिकावी लागेल.

जयपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादवने चांगली खेळी केली पण त्याने तो सामना संपवला नाही. सामना संपण्यापूर्वीच तो बाद झाला आणि त्यामुळे भारतीय संघ दडपणाखाली आला. यावर गौतम गंभीर खूश नाही. सूर्यकुमार यादवला सामना संपवायला यावे, असे गंभीरचे म्हणणे आहे, गंभीरच्या मते जेव्हा तुम्ही सेट असाल तेव्हा तुम्ही सामना जिंकल्यानंतर यावे.

स्टार स्पोर्ट्सवरील संवादादरम्यान तो म्हणाला, ‘मी सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचे कौतुक करतो पण त्याच्याबद्दल मी खूप निराश आहे. हा सामना संपवून तो यायला हवा होता. तुम्ही सुरुवात कशी करता याने काही फरक पडत नाही, पण तुम्ही शेवट कसा करता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही 60, 70, 80 धावा केल्या तरी काही फरक पडत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या संघासाठी शेवटची धाव घेता तेव्हा तुम्ही संघाचा सर्वात महत्त्वाचा भाग असाल. ऋषभ पंतच्या त्या धावा सूर्यकुमार यादवपेक्षा अधिक महत्त्वाच्या होत्या कारण तो सामने जिंकण्यासाठी संघात आला होता. त्यामुळे जेव्हा तुम्ही या स्थितीत असाल तेव्हा सामना जिंकून या.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!