मुंबई : गेल्या दीड वर्षापासून ज्या तीन कृषी कायद्यांमुळे (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते ते तीन कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मागे घेतल्याची घोषणा केली आहे. दीड वर्षापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर यश आले आहे. आज सकाळी देशाला संबोधित करत पंतप्रधान मोदींनी हे कायदे मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली. याबाबत आता चंद्रपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रया दिली आहे.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्याची घोषणा केल्यानंतर या कायद्यांना प्रचंड विरोध झाला. शेतकरी संघटनांनी हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लेच्या सीमेवर ठिया मांडला होता. केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या नाही तर फक्त मूठभर मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. या कायद्यांमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. तसेच अनेक राज्यांनी हे कायदे लागू करण्यासाठी विविध बदल सुचवत नकार दिला होता.
पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला फटका बसणार म्हणून मोदींनी हे कायदे रद्द केलेल सरकारला उशिरा सुचलेला शहाणपण आहे. संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, असं शरद पवार चंद्रपूरमधील पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहे.
मी दहा वर्षे कृषीमंत्री असताना संसदेत विरोधकांनी कृषी कायद्यांमध्ये बदल घडवण्याची मागणी केली होती. गुंतवणुकीला वाव मिळावा, शेतकऱ्यांच्या मालाला जागतिक बाजार पेठ मिळावी, अशा काही उद्देशाने मी कृषीमंत्री असताना कायद्यात बदल करावेत का, अशी चर्चा त्यावेळी झाली होती. मात्र, आपल्या घटनेने कृषी हा विषय राज्याकडे दिला. त्यामुळे राज्याशी चर्चा करुन, कृषी संघटनांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायाचा असं ठरवलं होतं. मात्र, कृषी संबंधित कायदे करायचे असल्यास त्यावर सविस्तर चर्चा अपेक्षित होती, पण सत्ताधाऱ्यांनी होऊ दिली नाही. या कृषी कायद्यामुळे शेती अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार होते, असं शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- …परंतु ही केवळ यूपी, पंजाबच्या निवडणुकीसाठीची नौटंकी तर नाही ना?- विजय वडेट्टीवार
- शेतकाऱ्यांसामोर या आधीही घ्यावी लागली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींना माघार
- ‘हे’ दुःखद, लज्जास्पद, पूर्णपणे अन्यायकारक; केंद्र सराकराच्या निर्णयावर कंगना नाराज
- ‘त्या गोष्टीवर काम करायला हवे’; गौतम गंभीरने सांगितली सूर्यकुमारची मोठी कमजोरी
- ‘देर आये दुरुस्त आये’, मोदींच्या ‘या’ निर्णयावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया


