मुंबई : तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या समस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं अखेर केंद्र सरकारला झुकावं लागलं आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर बॉलिवूड अभनेत्री कंगना रणौतने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कंगना ही अभिनेत्री असली तरीही ती वारंवार राजकीय वक्तव्य किंवा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच कंगनाने भारताच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर लगेच कंगनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरही टीका केली. तिच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सर्व स्तरातून तिच्यावर टीकेची झोड उठवली होती.
केंद्र सराकारने कृषी कायदे रद्द केल्यानंतर कंगना रणौत नाराज असल्याचं तिने सांगितलं आहे. वादग्रस्त शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अभिनेत्री कंगना रणौत निराश झाली आहे. तिने शुक्रवारी इंस्टाग्राम स्टोरीजवर आपले मत व्यक्त केले आहे.
कृषी कायदे रद्द करण्याबद्दल एका व्यक्तीचे ट्विट शेअर करत कंगनाने लिहिले, ‘दुःखद, लज्जास्पद, पूर्णपणे अन्यायकारक. संसदेत निवडून आलेले सरकार नाही तर रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले असतील तर हे जिहादी राष्ट्र आहे. ज्यांना असे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन’, असं म्हणत कंगनाने कृषी कायदे रद्द करण्याला समर्थन देणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.
https://twitter.com/KanganaOfficia/status/1461554104254156801?s=20
महत्वाच्या बातम्या
- ‘देर आये दुरुस्त आये’, मोदींच्या ‘या’ निर्णयावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
- ‘आंदोलन मागे घेतले जाणार नाही, जोपर्यंत..’, टिकैत यांचा मोदींना इशारा
- ‘शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा २०१७ मध्येच फुटला’, फडणवीसांचे टीकास्त्र
- मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना अंतरिम दिलासा; २ डिसें.पर्यंत कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश
- ‘भाजप नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी’, संजय राऊतांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

