नवी दिल्ली: गेल्या दीड वर्षापासून ज्या तीन कृषी कायद्यांमुळे (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते ते तीन कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मागे घेतल्याची घोषणा केली आहे. दीड वर्षापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर यश आले आहे. त्यामुळे शेतकाऱ्यांमधून जल्लोष बघायला मिळत आहे. मात्र आंदोलन अजूनही मागे घेणार नसल्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी जाहीर केले आहे. जोपर्यंत संसदेत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने आंदोलकांशी अनेक मार्गांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. ज्या तरतुदींबद्दल आक्षेप आहे, त्या बदलण्याची तयारी सुद्धा केंद्राने दाखवली होती. मात्र शेतकऱ्यांना हे कृषी कायदे समजावण्यात आम्ही कमी पडलो असल्याचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या घोषणेनंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर खोचक टीका करण्यास सुरूवात झाली आहे.
शेतकाऱ्यांसामोर माघार घेण्याची मोदी सरकारची ही पहिलीच वेळ नाही. या आधी मोदी सरकारला आपल्या पहिल्या टर्मच्या वेळेस सुद्धा शेतकाऱ्यांसामोर माघार घ्यावी लागली होती. पहिल्या टर्मच्या वेळेस सरकारने भू संपादनाला वेग देण्यासाठी अध्यादेश आणले होते. मात्र त्याला शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला होता. शेतकऱ्यांनी दर्शवलेल्या या विरोधासमोर अखेर मोदी सरकारला माघार घ्यावी लागली होती.
भू संपादन अध्यादेश काढण्यात आला तेव्हा ८० टक्के शेतकऱ्यांची त्याला सहमति असणे गरजेचे होते. मात्र नव्या अध्यदेशातून ही तरतूद काढून टाकण्यात आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा जोरदार विरोध केला होता. विरोधकांकडून देखील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्यावेळी सरकारला राज्यसभेत पुरेशा संख्याबळाअभावी या संदर्भात कायदा मंजूर करून घेता आला नाही. शेतकाऱ्यांकडून होत असलेल्या या विरोधामुळे अखेर ३१ ऑगस्ट २०१५ रोजी केंद्र सरकारने माघार घेतली होती.
महत्वाच्या बातम्या:
- ‘हे’ दुःखद, लज्जास्पद, पूर्णपणे अन्यायकारक; केंद्र सराकराच्या निर्णयावर कंगना नाराज
- ‘त्या गोष्टीवर काम करायला हवे’; गौतम गंभीरने सांगितली सूर्यकुमारची मोठी कमजोरी
- ‘देर आये दुरुस्त आये’, मोदींच्या ‘या’ निर्णयावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
- कपिल देव यांनी रोटेशन पॉलिसीवर उपस्थित केले प्रश्न; म्हणाले…
- ‘मोडेन पण वाकणार नाही’; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया


