मुंबई : गणेशोत्सवामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेबाजी केली होती. तेव्हापासून शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगली असल्याचं पाहयला मिळतं आहे. अशातच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमिस शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलंय अग्रलेखात ?
अमित शहा यांना त्यांचे राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाहीने हा अधिकार सर्वांना दिला; पण भाजप व त्यांचे नेते लोकशाही मार्गाने जात आहेत काय? मग, शिवसेना फोडली कशासाठी?, असा सवाल करत शिवसेनेने अमित शहा यांना लक्ष्य केलं आहे. शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात हे लिहिलं गेलं आहे.
तसेच, लोकशाहीचे चारही स्तंभ अस्थिर करून देशाचे नियंत्रण काही मंडळींनी हातात घेतले आहे. त्यांनी एका बाजूला ‘मिशन मुंबई’ तर दुसऱ्या बाजूला ‘मिशन बारामती’चे षड्डू ठोकले जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे नेतृत्व पूर्णपणे खत्म करायचे व तोतयांच्या हाती हे राज्य सोपवायचे. मुंबईचा सरळ घास गिळायचा असा हा कट शिजला असल्याचंही त्यामध्ये म्हटलं आहे.
पुढे अग्रलेखात असंही लिहिलं आहे की, अमित शहा ‘मातोश्री’वर आले होते. त्यावेळी त्यांच्या समोरच सत्तेचे वाटप समसमान झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मीडियासमोर जाहीर केले होते. त्याचवेळी अमित शहांनी फडणवीस यांना थांबवले असते तर बरेच झाले असते, असंही अग्रेलाखात म्हटलं गेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Amit Shah | “राहुल बाबा परदेशी टी-शर्ट घालून…” ; अमित शहा यांचा हल्लाबोल
- Shivsena | शिवसेनेला पुन्हा धक्का! ‘हे’ आमदार करणार शिंदे गटात प्रवेश
- Vinod Tawde | विनोद तावडे यांच्यावर नितीशकुमारांचे चक्रव्यूह आणि महागठबंधन फोडण्याची जबाबदारी
- Nitesh Rane | “जसे उद्धव ठाकरे तशाच किशोरी पेडणेकर”; नितेश राणेंचा हल्लाबोल
- Nitesh Rane | देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट! नितेश राणेंचे उद्गार, शिवसेनेवर सोडले टीकास्त्र


