Share

Nitesh Rane | “जसे उद्धव ठाकरे तशाच किशोरी पेडणेकर”; नितेश राणेंचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : याकूब मेमनच्या कबरीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुद्यावर भाजप पक्षनेत्यांनी शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. आतातर आता याकूब मेमनचा नातेवाईक असलेल्या रऊफ मेमनसोबत शिवसेनेच्या नेते आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैठक घेतल्याचा भाजपकडून दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातील व्हिडीओही भाजपने जारी केला आहे. अशातच याच मुद्यांवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षावर हल्ला केला आहे.

नितेश राणे यांचे वक्तव्य-

किशोरी पेडणेकर यांची रऊफ मेमनसोबतची भेट म्हणजे आश्चर्य नाही. दशहतवाद्यांबरोबर संबध असणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत होते. जसे उद्धव ठाकरे तशाच किशोरी पेडणेकर, असं म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत हिंदू, लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि आदिवासी तरूणाच्या अपहरणाच्या निषेधार्थ श्रीरामपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पुढे नितेश राणे यांनी असंही म्हटलं की, शिवसेना राहिली कुठे? शिवसेना आमच्यासोबतच आहे. अडीच वर्षाच्या कारकीर्दीत हिदू सणांवर निर्बंध टाकले. त्यांनी हिंदुत्वाची भाषा करू नये.

दरम्यान, भाजपने केलेल्या आरोपांवर किशोरी पेडणेकरयांनी भाजप पक्षावर पलटवार केला आहे. त्या म्हणाल्या की, मी कामाने मोठी झाले. मी तुमच्यासारखे मुंबईत छक्के-पंजे खेळले नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!