Share

Shivsena | शिवसेनेला पुन्हा धक्का! ‘हे’ आमदार करणार शिंदे गटात प्रवेश

Published On: 

मुंबई : 50 आमदारांसोबत बंड करुन एकनाथ शिंदे यांनी शिवसेना अर्थातच उद्धव ठाकरे यांना मोठा झटका दिला होता. यानंतर अनेक आमदारांनी शिवसेनेला रामराम ठोकला. अशातच चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून मोठी बातमी समोर आली आहे. या मतदार संघाचे शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश करणार आहेत.

शिवसेना अर्थात उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्काः

शिंदे गटात एन्ट्री मारणार असल्याची घोषणा चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कधीही भेटीसाठी वेळ दिला नाही, अशी नाराजी चव्हाण यांनी व्यक्त केली.

सदानंद चव्हाण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातः

चव्हाण यांच्या या निर्णायामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय वाद सुरु असताना आता चव्हाण यांनी राजकीय भूकंप केला आहे. माझा पराभव झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधीही भेटीसाठी वेळ दिला नाही, असं ते म्हणाले.

येत्या 15 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी मी शिंदे गटात प्रवेश करणार आहे, असं चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले. चव्हाण शिंदे गटात सामील झाल्यावर शिंदे गटाला रत्नागिरी जिल्ह्यात बळकटी मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्याः

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!