Share

Amit Shah | “राहुल बाबा परदेशी टी-शर्ट घालून…” ; अमित शहा यांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

जोधपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा खरपूस समाचार घेतला. त्यांनी आधी भारताचा इतिहास वाचावा, असे शहा यांनी म्हटले आहे. शहा यांनी राजस्थानमधील गेहलोत सरकारवर व्होट बँक आणि तुष्टीकरणाचे धोरण अवलंबल्याचा आरोप केला. येथील रावण चबुतरा मैदानावर भाजप बुथ कार्यकर्ता संकल्प महासंमेलनाला अमित शहा संबोधित करत होते.

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा उल्लेख करताना ते म्हणाले की, “आत्ताच राहुलबाबा भारत जोडो यात्रेला निघाले आहेत. परदेशी टी-शर्ट घालून ते भारताला जोडण्यासाठी निघाले आहेत. मी राहुल बाबा यांनी संसदेत दिलेल्या एका भाषणाची काँग्रेसजनांना आठवण करून देतो. भारत हे राष्ट्र नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुलबाबा, हे कोणत्या पुस्तकात वाचले आहे? हे ते राष्ट्र आहे ज्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले आहे.”

राहुल गांधींनी भारताचा इतिहास वाचण्याची गरज-

अमित शाह म्हणाले की, राहुल गांधी भारताला जोडण्यासाठी बाहेर पडले आहेत, मला वाटते त्यांनी भारताचा इतिहास वाचण्याची गरज आहे. अमित शहा यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, गेहलोत सरकार विकासाची कामे करू शकत नाही, ते केवळ व्होट बँकेचे आणि तुष्टीकरणाचे राजकारण करू शकते.

काँग्रेस केवळ पोकळ आश्वासने देऊ शकते-

काँग्रेस सरकार विकासाची कामे करू शकत नाही. ते रस्ते बांधू शकत नाही, वीज देऊ शकत नाही, रोजगार देऊ शकत नाही. काँग्रेस व्होट बँकेचे तुष्टीकरण करूनच राजकारण करू शकते. काँग्रेस केवळ पोकळ आश्वासने देऊ शकते, ती आश्वासने पूर्ण करू शकत नाही, असे शहा म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!