Share

Nitesh Rane | देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट! नितेश राणेंचे उद्गार, शिवसेनेवर सोडले टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आदिवासी समाजातील दीपक बर्डे याने एका मुस्लिम युवतीसोबत लग्न केलं. यानंतर मुलीच्या मामाने दीपकला मारहाण करत अपहरण केले, असा आरोप त्याच्या मित्रांनी केला आहे. त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असून या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच दिवस ओलांडले तरी दीपकचा पत्ता लागला नाही. मात्र, प्रकरणाला राजकीय वळण आलं असून नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांना हिंदूह्रदयसम्राट म्हणत शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस हिंदुह्रदयसम्राट म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणाः

नितेश राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडत आता महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक राहिलेले नाहीत, आज नगर जिल्ह्याचा पालकमंत्री तो हसन मुश्रीफ नाहीये आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण नाहीये, हे संबंधितांनी लक्षात ठेवावं, असं म्हटलं आहे. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत जे कडवट हिंदुत्ववादी आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून हिंदुहृदयसम्राट देवेंद्र फडणवीस काम करत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी हे हिंदुत्ववादी सरकार आहे हे लक्षात ठेऊनच काम करावं, अशी स्पष्ट धमकीच भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली.

हिंदू मुलाकडे वाकड्या नजरेने बघितले तर त्यांचे डोळे जागेवर राहणार नाहीतः

यादरम्यान, कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याने आमच्या हिंदू मुलाकडे वाकड्या नजरेने बघितले तर त्यांचे डोळे जागेवर राहणार नाहीत, हे लक्षात ठेवावं, असा गंभीर इशारा राणेंनी दिला आहे. पोलीस प्रशासनात अनेक चांगले अधिकारी आहेत जे हिंदूंना न्याय देतात, त्यांची बाजू घेतात, सगळेच वाईट आहेत, अशातला प्रकार नाही. पण जे वाईट आहेत, ज्यांच्यासाठी माझा हा इशारा समजा, अशी धमकीच नितेश राणे यांनी दिली.

दरम्यान, माझ्या शेजारी दीपकचे वडील आहेत. त्यांची नेमकी काय चूक? दीपक हिंदू कुटुंबात जन्माला आला ही त्यांची चूक आहे का? असा सवाल राणेंनी केला. आज जे दीपकबरोबर झालं ते आपल्या कुणाही बरोबर होऊ शकतं, याची जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे. जसे आपल्या समोरच्या धर्माची लोक त्यांच्या धर्मासाठी एकत्र येतात तसं आपणही हिंदू म्हणून एकवटलं पाहिजे. तेव्हाच आपली ताकद त्यांना कळेल. मी येणार आहे म्हणून इथला पीआय सुट्टीवर गेलाय. पण तो कधीपर्यंत सुट्टीवर जाईल, त्याला माझ्याशीच बोलायला लागेल ना, त्याने लक्षात ठेवावं, हे हिंदुत्ववादी सरकार आहे. आरोपींना अटक झालीये पण मुलगा सापडत नाहीये. पण जर अजून काही दिवस दीपक सापडला नाही तर महाराष्ट्रातला हिंदू समाज तांडव करेन, असा संताप राणेंनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!