Share

Nitesh Rane : खऱ्या अर्थाने कोणी दगा दिला हे उद्धव ठाकरेंना समजलं नाही – नितेश राणे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी दरम्यान उद्धव ठाकरे यांनी जवळच्या माणसांनी दाग दिल्याचं आपल्या भाषणात म्हंटल होतं. या संदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून उद्धवजी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

खऱ्या अर्थाने दगा कोणी दिला हे अजून उद्धव ठाकरेजींना समजलं नसल्याचं नितेश राणे यांनी म्हंटल आहे. खऱ्या अर्थाने दगा कोणी दिला हे पाहायच असेल तर स्वत:च्या घरापासून सुरुवात करण्याचा सल्ला यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

त्याबरोबरच उद्धव ठाकरे यांचे भाचे वरुण सरदेसाई यांच्यावर देखील नितेश राणे यांनी यावेळी गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये वरुण सरदेसाई यांनी त्यांच्या सत्तेचा गैरवापर करत लोकांच्या घराबाहेर धिंगाणा घातला असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात, की मला एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांनी दगा दिला. मी उद्धव ठाकरे यांना सांगेन की, दगा नेमका कोणी दिला हे खऱ्या अर्थाने पाहायचे असेल तर आपण आपल्या घरातून सुरू केलं पाहिजे. आपल्या अवतभोवती असलेले , कधी निवडून न येणारे जे लोक आहेत त्यांनी तुम्हाला खऱ्या अर्थाने दगा दिला हे उद्धव ठाकरेंना समजलं नाही. सुरुवात करायची असेल तर ती आपल्या भाच्या पासून सुरू करा. ज्यांनी अडीज वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जी तुमची बदनामी केली. सत्तेचा गैरवापर केला. लोकांच्या घराबाहेर जाणं. लोकांच्या घराबाहेर धिंगाणा घातला. अस नितेश राणे यांनी या व्हिडिओत म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!