मुंबई : राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आता निवडणूक लढवणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. आपण आता निवडणूक लढवणार नाही, ही माघार नाही तर हा माझा स्वाभिमान आहे, अशी घोषणा खुद्द संभाजीराजे यांनी केली आहे. इतर अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केले आहे. संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे.
अपक्ष निवडणूक लढवणार असं जाहीर केल्यानंतर मला शिवसेनेकडून मला ऑफर होती. पण शिवसेनेचा अधिकृत उमेदवार व्हा, असे सांगितल्याने मी तो प्रस्ताव नाकारला. शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून मला शिवसेनेने पाठिंबा द्यावा, असा माझा प्रस्ताव होता. त्यावर चर्चा झाली, बैठका झाल्या. मात्र हा प्रस्ताव पुढे सरकत असतानाच अचानक संजय पवार यांनी उमेदवारी देण्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. या बातम्यांनी मी हादरलो. मलाही दुःख झालं, असे संभाजीराजे यांनी म्हंटले आहे.
संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण संजय पवार यांना जाहीर केलेल्या उमेदवारीबद्दल विचारणा करण्यासाठी फोन केला पण उद्धव ठाकरे यांनी आपला फोन घेतला नाही. ज्या शिवसेना आमदार आणि मंत्र्यांकडे याबाबत चर्चा केली होती, त्यांच्याकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, ” असं शब्दात संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या :


