पुणे : ओबीसी आरक्षण संदर्भात भाजपने मंत्रालयावर मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंना उद्देशून केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आता चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. राज्य महिला आयोगाकडे चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.
ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमक होत आहे. भाजपने मुंबईमध्ये सरकारविरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान चंद्रकात पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. “ओबीसी आरक्षण देता येत नसेल तर तुम्ही राजकारणात कशासाठी आहात, घरी जा आणि स्वयंपाक करा. मसणात जा नाहीतर आरक्षण द्या, असे चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हंटले होते.
दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी देखील चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा निषेध केला. आता मात्र चंदकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात एक पत्र आले आहे. अजित देशपांडे, अक्षय देसाई, तृणाल टोणपे, ऋशिकेश शिंदे, सौरभ ठाकरे, सिद्धी जागडे, प्रथमेश जैन इत्यादी कार्यकर्त्यांनी चाकणकर यांना पत्र पाठवत, पाटलांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :


