🕒 1 min read
पुणे: बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना CBI कडून अटक करण्यात आली आहे. डीएचएफएल प्रकरणात 300 कोटींहून जास्तची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांमध्ये अविनाश भोसले यांच्या पुणे-मुंबई परिसरात सीबीआयने छापेमारी केली होती, त्यानंतर अखेर त्यांना काल (२६ मे) अटक करण्यात आली आहे.
अविनाश भोसले यांना येस बॅंक आणि डीएचएफएल बॅंक गैरव्यवहार प्रकरणी CBI ने अटक केली आहे. भोसले यांच्या घरावर मागील वर्षी CBI ने त्यांची 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. दरम्यान येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली असून विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याच प्रकरणी अविनाश भोसले यांचेही नाव पुढे आले होते.
दरम्यान अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, उद्योजक असून त्यांचा मुंबई व पुण्यात बांधकाम व्यवसाय आहे. दरम्यान, सीबीआयने गुरुवारी सायंकाळी त्यांना त्यांच्या घरातुन अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Women’s T20 Challenge 2022 VEL vs TRL : मॅच जिंकूनही स्मृती मंधानाची टीम स्पर्धेबाहेर..! महाराष्ट्राची ‘किरण’ चमकली
- चंद्रकांत पाटलांविरुद्ध महिला आयोगाकडे तक्रार ; सुप्रिया सुळेंविरोधात केलेलं वक्तव्य भोवणार
- Women’s T20 Challenge 2022 VEL vs TRL : ट्रेलब्लेझर्सची व्हेलॉसिटीपुढं ‘विक्रमी’ धावसंख्या; मेघना, रॉड्रिग्स यांची अर्धशतके!
- देवबागवासीय राणे पितापुत्रांवर ४२० चा गुन्हा दाखल करणार – वैभव नाईक
- IPL 2022 : “मला माझ्या शतकाची पडली नव्हती..”, असं म्हणणारा रजत मनोहर पाटीदार नक्की कोण?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
